शिवसेनेच्या राजकीय वाढत्या प्रभावामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा कार्यक्रमावर बहिष्कार

0
47

यावल, प्रतिनिधी । यावल पंचायत समिती आवारात नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा काल दि.24 रविवार रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या व इतर प्रमुख विशेष अतिथींच्या उपस्थित संपन्न झाला परंतु या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकल्याने रावेर व चोपडा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यावल तालुक्यात पूर्व पश्चिम भागात दोन आमदार आहेत पूर्व भागात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी तर पश्चिम भागात यावल तालुक्याचा काही भाग समाविष्ट असलेल्या चोपडा विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे आहेत.

चोपडा तालुक्यात तसेच यावल रावेर तालुक्यात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीशभाऊ महाजन,आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या विशेष उपस्थितीत आणि शुभहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन लोकार्पण सोहळा कार्यक्रम करण्यात येत असल्याने पर्याय शिवसेनेचा प्रभाव वाढत असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठराविक बोटावर मोजता येणारे काही (जिल्हा परिषद गट नेते प्रभाकर आप्पा वगळता)पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या पायाखालची राजकीय वाळू सरकायला लागली असून चहापेक्षा किटली गरम होत असल्याने पक्षातीलच काही पदाधिकारी,कार्यकर्ते आपल्या लोकप्रिय काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांचे शुद्ध दिशाभूल करून प्रशासनाने आयोजित केलेल्या तसेच शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्री गुलाबराव पाटील,माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या उपस्थितीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने रावेर व चोपडा विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकारणात संभ्रम निर्माण झाला.कारण शिरीषदादा चौधरी आपल्या राजकीय,सामाजिक, वैयक्तिक कारणास्तव व्यस्त राहिले असते तर तसेच कार्यक्रमाविषयी काही नाराजी असती तर त्यांनी या कार्यक्रमाविषयी त्यांची भूमिका नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केली असती असे सुद्धा त्यांच्याच हितचिंतकांमध्ये बोलले जात आहे.

कारण काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मागे राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सहकार क्षेत्राचा मोठा वारसा आहे,रावेर विधानसभा कार्य क्षेत्राचा सर्वांगीण विकास व जन हिताची कामे करणे हेच त्यांचे ध्येय व उद्दिष्ट आहे.ते कधीही आरोप-प्रत्यारोप हेवेदावे सुडाचे राजकारण करीत नाही.यावल येथील पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा त्यांना देण्यात आले होते.निमंत्रण देण्यासाठी यावल पंचायत समिती सभापती सौ.पल्लवीताई पूरुजित चौधरी यांनी प्रत्यक्ष भेटून आमदार चौधरी यांना आग्रह करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि आहे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कार्यक्रम तारखेत बदल करणेबाबत सुद्धा त्यांनी चर्चा केली होती तरी सुद्धा आमदार शिरीषदादा चौधरी यांना त्यांच्याच पक्षातील काही मोजक्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उलट सुलट सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला यामुळे यावल रावेर तालुक्यात अनेक राजकीय प्रश्न उपस्थित केले जात आहेत.तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या त्या काही पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रत्यक्ष कामकाजावर लक्ष केंद्रित करून निरर्थक गोष्टीवर विश्वास न ठेवता जनहितासाठी ठोस निर्णय घ्यावा असे संपूर्ण यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे.

कार्यक्रमात खिसेकापू आले कसे? 75 हजाराची पाकिट मार
पालक मंत्री ज्या ठिकाणी कार्यक्रमात असतात.त्या ठिकाणी नियोजनपूर्वक पोलिस बंदोबस्त असतो हे कोणीही नाकारू शकणार नाही अशा परिस्थितीत या कार्यक्रमात तीन चार जणांचे खिसे कापून 70 ते 75 हजार रुपये लांबविणारे पॉकेटमार करणारे नेमके या कार्यक्रमात कोणाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी कार्यक्रमाची बदनामी करण्यासाठी आले होते का? याबाबतची चौकशी करून यावल पोलिसांनी त्या पॉकेट मारांचा शोध घेऊन खिसे कापणाराना ज्याने कोणी आमंत्रित केले असेल त्याच्यावर कार्यवाही करावी असे सुद्धा तालुक्यात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here