शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांनी शब्द पाळला, सिद्धेश्वर देवस्थानाचा होणार कायापालट

0
7

औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज देवस्थान आणि परिसराचा विकास होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या देवस्थानाचा कायापालट करण्याचे आश्वासन सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिले होते. दिलेला शब्द खरा करत सत्तार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून दोन कोटींच्या निधीला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवली आहे.

मागच्या अधिवेशनात या देवस्थानाचा ‘ ब ‘ वर्गाच्या तीर्थक्षेत्रात समावेश करून घेतल्यानंतर या क्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळवण्याचा सत्तार सतत प्रयत्न करत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याने सत्तारांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे. श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान येथे औरंगाबाद जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातून भाविक येत असतात. त्या प्रमाणात या ठिकाणी सुविध उपलब्ध नाहीत. मात्र आता या देवस्थानाचा संपूर्ण कायापालट केला जाणार आहे.

भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे भक्त निवास, नवसपूर्तीसाठी किचन शेड, पूजेसाठी शेड, रस्त्यांचा विकास, विद्युत रोशनाई, स्वच्छतागृह आणि परिसरात उद्यान आदी मूलभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा विकास व्हावा हे माझे अनेक दिवसापासूनचे स्वप्न होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निधी मंजुरीला परवानगी दिल्यानंतर हे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याबद्दल सत्तार यांनी समाधान व्यक्त केले आहे. याआधी फर्दापूरच्या पायथ्याशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला देखील मंजुरी मिळवली आहे. या शिवाय मतदारसंघातील छोटे मोठे सिंचनाचे प्रकल्प, त्याचे सर्वे आणि प्रत्यक्ष कामांना मंजुरी सत्तार यांनी मिळवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here