शिवसेना महानगरतर्फे शासकीय योजना शिबिर

0
16

जळगाव ः प्रतिनिधी
शिवसेना जळगाव महानगरतर्फे प्रभाग क्रमांक पाचमध्ये शासकीय योजना शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.महानगरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेना विभागप्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले.
शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगर प्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता कोल्हे-माळी , निलू इंगळे, कडू चौधरी, दीपक मराठे, कुंदन चौधरी, नारायण चौधरी, भय्या ठाकूर, मुन्ना परदेशी, प्रल्हाद पाटील उपस्थित होते.
या शिबिरात आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रमयोगी मानधन योजना, मतदान कार्ड, पॅनकार्ड नूतनीकरण योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, स्मार्ट आधारकार्ड योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात ४ जानेवारी ते १० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येईल, असे विभागप्रमुख प्रशांत सुरळकर यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here