शिवसेना मदत कक्षाचा ११८३ रिक्षा चालकांचा घेतला लाभ

0
58

जळगाव ः प्रतिनिधी
शिवसेना जळगाव महानगर तर्फे शिवसैनिक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात पांडे चौक येथे रिक्षा चालक बांधवांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले. रविवार पर्यंत ११८३ परवानाधारक रिक्षा चालक बांधवांनी शिवसेना कक्षामार्फत ऑनलाईन अर्ज भरले आहे.
२५ ते ५ जून पर्यंत शहरातील परमीटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील ७ लाख १५ हजार परमिटधारक रिक्षा चालकांना लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून १ हजार ५०० रूपये घोषीत करण्यात आले आहे. सदर रक्कम परमिटधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार असून यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
तरी जास्तीत जास्त परवानाधारक रिक्षा चालक बांधवांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसैनिक तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे.
यशस्वीतेसाठी व अर्ज करून देण्यासाठी शिवसैनिक सुनील मराठे, मयुरी चौधरी, मिनेश जैन, कोमल चौधरी, प्रितम शिंदे, अमित जगताप, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, अर्जून भारूळे, गोकूळ बारी, पियुष हसवाल, गणेश भोई, राहूल चव्हाण, अमोल गोपाल, संकेत छाजेड, दिपक नेटके, अशफाख शेख, संदिप सुर्यवंशी, नवल गोपाल, मनोज चव्हाण, विपिन कावडीया आदी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here