जळगाव ः प्रतिनिधी
शिवसेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरातील पांडे चौक येथे दि. २१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान विविध शासकीय योजना शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये आयुष्यमान भारत जनधन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन, श्रावणबाळ पेन्शन, स्मार्ट आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ. योजनांचा समावेश आहे. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शिबिराचे उद्घाटन नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव-अमित जगताप, शोभा चौधरी, प्रताप पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष-शिवराज पाटील, दिनेश जगताप, मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, जाकीर पठाण, हेमंत महाजन, वसिम खान, प्रितम शिंदे, संदिप सुर्यवंशी, गोकुळ बारी, सौरभ कुळकर्णी, गजानन चौधरी, सुनिल मराठे, पियुष हसवाल, उमाकांत जाधव आदी उपस्थित होते.सदर योजनांचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशन व शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.