शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा अंमल हीच खरी आदरांजली – विश्‍वनाथ पाटील

0
27

भुसावळ : प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन महान नेत्यांची जयंती असून त्यांच्या जीवनातून आपल्याला ज्वाजल्य देशभक्ती शिकायला मिळाली आहे. दोन्ही नेते जहाल मतवादी होते. त्यांनी आयुष्यात कधीही शब्द फिरविला नाही. एकनिष्ठ, एकवचनी आणि एकाच विचाराला प्रमाण मानणाऱ्या या नेत्यांच्या विचारांची अंमल बजावणी हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी याप्रसंगी  केले.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील ग्रामपंचायतीत अभिवादन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून कुर्हे येथील ग्रामपंचायतीत छोटेखानी कार्यक्रमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जनार्दन पाटील हे होते. यावेळी पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन व ग्राम पंचायत सदस्य  नाना पाटील  यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सरपंच जनार्दन पाटील, उपसरपंच विलास रंदाळे ,  ग्रा. प. सदस्य नाना पाटील, रामलाल बडगुजर, हरिचंद्र बरकले , किशोर कोळी, सावकार पारधी , संजय वराडे, प्रमोद उंबरकर, किशोर पाटील, संदीप महाजन तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र नागपुरे, दिनेश काकडे, एकनाथ धांडे, ग्रा. प. कर्मचारी राजेंद्र पाटील, संदीप बारी, विकास धांडे, सुनील जैन, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र नागपुरे  यांनी केले. तर सूत्रसंचालन पिंटू उंबरकर तर  आभार सरपंच जनार्दन पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here