शेंदुर्णी येथील युवासेना शहर प्रमुखांच्या कानाखाली कोणीही लगावली नसून हा खोटा आरोप – पो नि धनवडे

0
46

पहूर, प्रतिनिधी । पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण धनवडे साहेब यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्णी येथील अजय भोई शिवसेनाप्रमुख याच्या कानाखाली कोणीही लगावली नसून हा खोटा आरोप करत आहे.

शेंदुर्णी येथील एका वृद्धला फक्त घुरघूर का बघतो या कारणावरून त्यास एका शिवसेना पदाधिका-याने बेदम मारहाण केली, व पोलीस ठाणेस आल्यावर देखील त्यांचेशी अरेरावी व भांडण केले म्हणून त्यांना पोलीस ठाणेत बसवून त्यांचे विरोधात वृद्धाची एन.सी. नोंद करीत असताना नमुद भांडणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसताना अजय भोई नावाचा इसम प्रतिबंधीत क्षेत्रात (जेल समोर) विनापरवाना घुसून आरडाओरडा केला, सदरवेळी वायरलेस वर वरिष्ठांचा ग्रुप कॉल चालू असल्याने त्यास आम्ही शांत राहण्याचा इशारा करूनही तो मोठमोठ्याने बोलत होता, म्हणून आम्ही त्याला जबरदस्तीने पोलिस ठाण्यातून बाहेर काढले. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, हे मला माहीत नव्हते.

सदर इसमाने या आधी गेल्या दोन महिन्यांपूर्वी शेंदुर्णी येथे घडलेल्या धार्मिक दंगलीतील आरोपी नामे- चुवा भोई याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी आमचेवर दबाव टाकून खुप प्रयत्न केले होते, ते आम्हाला अमान्य होते. त्यांनंतर अजय भोई हा पहूर दरवाजा शेंदुर्णी येथे गर्दीचे ठिकाणी फटाक्यांचे दुकान लावत असताना त्यास आम्ही दुकान काढून टाकण्यास प्रवृत्त केले होते.
त्यामुळे त्याने माझ्यावर मारहाणीचा खोटा आरोप केला आहे.

तसेच आम्ही पोलीस ठाणेस रुजू झाले पासून अवैध धंद्यावर वचक बसल्याने माझ्याकडे राजकीय पुढाऱ्यांचे येणे जाणे किंवा गोंधळ घालणे असे प्रकार मी बंद केले आहे, त्यामुळे राजकीय एजंट सुध्दा बंद झाले आहेत आणि हा माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, तसेच गावठी दारू सह अवैध धंद्यावर नियंत्रण आणले आहे, आणि चोरीचे प्रमाणही कमी झाले आहे, पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादींना बसण्यासाठी स्वतःच्या पैशातून नवीन खुर्च्या आणल्या आहेत. तसेच स्टाफ साठी नवीन पाण्याची टाकी बसविण्यात आले आहे, आणि आजूबाजूचा परिसर स्वतःहा स्वच्छ करत आहे, आणि लाऊड स्पीकर व्दारे आणि व्हॉट्सॲप व्दारे माझा मोबाईल क्रमांक नागरिकांना कळवून कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास थेट फोन करा असे आवाहन पहूर परिसरासह आजुबाजू खेड्यापाड्यांत नागरिकांना आवाहन केले आहे.

तसेच गरूड हायस्कूल, सरस्वती हायस्कूल शेंदुर्णी आणि आर. टी. लेले हायस्कूल पहुर व इतर विद्या मंदिरांत मुलांना आणि मुलींना योग्य मार्गदर्शन करून कुठलीही अडचण आल्यास पोलीस काकांना फोन करा असे कळवले आहे, बस स्टॅन्ड जवळ विनाकारण फिरणाऱ्यांना, गर्दी करणा-यांना आळा घातला आहे, कोणाला कुठल्याही प्रकारे दबाव, धमकी कोणी देत असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस स्टेशनचा लॅंडलाईन बंद पडल्याने नवीन नंबर सुरू करून आमचा खाजगी व पोलीस ठाण्याचा नवीन नंबर बाहेर भिंतीवर झेरॉक्स करून लावलेला आहे, जेणे करून प्रत्येकाजवळ आमचा मोबाईल असेल. आम्ही लोकांशी आदबीने व प्रेमाने वागत असतो. मात्र गुंडापुंडांना व गुन्हेगारांना कोणताही थारा देत नसतो.तसेच मॉर्निंग वॉक च्या माध्यमातून दररोज १० कि,मी, ते ३०कि,मी,पायी चालुन हद्दीतील खेड्यातील शेतकरी जनतेशी सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले, जनतेशी आपुलकीची नाळ घट्ट केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here