चाळीसगाव ः प्रतिनिधी
सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिवरथ यात्रेसाठी चाळीसगाव येथून रवाना होणार्या दुर्ग सेवकांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी झेंडा दाखवून यात्रेचा काल रात्री शुभारंभ केला व सर्व दुर्गसेवकांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयोजित असलेल्या या यात्रेला यश मिळो आणि महाराष्ट्रातील गड-किल्ले सुरक्षित राहावेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गड किल्ले संवर्धनकार्यावर अधिक भर देण्याचे देखील ठरविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाने, तालुका संघटक सुनिल गायकवाड, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे,शुभम चव्हाण,गजानन मोरे, दीपक राजपूत, योगेश शेळके,वाल्मीक पाटील,विनोद शिंपी, रविंद्र दुशिंग,जितेंद्र वाघ,गणेश पाटील,सचिन पाटील,संजय पवार, दिगंबर शिर्के,जयंत शेलार,जितेंद्र वरखेडे, ज्ञानेश्वर चौधरी,सचिन घोरपडे, सचिन पाटील,प्रतिक पाटील,सोहम येवले,सुमित वरखेडे, दिनेश घोरपडे, विकी राठोड,अभिलाष पाटील, रितेश पाटील आदी उपस्थित होते.