जळगाव, प्रतिनिधी । येथील पवन चारीटेबल ट्रस्ट व धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय,जळगाव च्या वाणिज्य विभागातर्फे केंद्र सरकारच्या टेक्स्टाईल विभागातर्फे नुकतेच महाविद्यालय परिसरातील बचत गट सदस्यांसाठी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हस्तकला कारागीर यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण वर्गात सहाय्यक संचालक संतोष कुमार यांनी वेगवेगळ्या हस्तकलांचे प्रशिक्षण दाखविले यात एम्ब्रोईडरी, ज्वेलरी, सोनारिका, लाकूडकाम, मातीकाम, पेंटिंग अशा विविध 40 ते 50 हस्तकला प्रकारांचे प्रशिक्षण त्यांनी दिले. सदर कार्यक्रमास महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमास शैलेशसिंग, जयप्रकाश मेने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी वाघुळदे, डॉ. विलास नारखेडे, क्रीडा संचालक डॉ. पी. आर. चौधरी ग्रंथपाल सुनील पाटील, वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा. तृप्ती काळे, अग्रणी मॅडम इत्यादी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण अंबुसकर, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, विजय चौधरी, संजय जोशी, विजय पाटील, सुनील सरोदे यांनी परिश्रम घेतले.