जळगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली, वसंतवाडी, वराड व वडली या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी ३६ लाखांची तरतुद करण्यात आली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासह जलनिस्सारणाची सुविधा केली जाणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.
शिरसोली प्र.न. येथे शनिवारी सायंकाळी आयोजीत कार्यक्रमात या रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले. पालकमंत्री पाटील यांनी या रस्त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची सोय होणार आहे. मतदारसंघात याचप्रमाणे विकासकामांचा झंझावात कायम राहणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, नाना सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, कृउबा सदस्य पंकज पाटील, शिरसोली सरपंच प्रदीप पाटील, शिरसोली प्र.न. सरपंच हिलाल भिल, ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंदे, प्रवीण पाटील, सुनील पाटील, रईस पिंजारी, मुरलीधर धेंगळे, सुधाकर पाटील, सलीम खाटीक आदींची उपस्थिती होती.