शिरसोलीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्याचा खुनाच आरोप

0
18

जळगाव:प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली येथे आज सकाळी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या माहेरच्या लोकांनी पैशासाठी तिचा खून सासरच्या लोकांनी केला असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
प्राजक्ता अजय बारी (बुंधे) वय २२ रा. शिरसोली प्र.न. ता.जि. जळगाव असे या विवाहितेचे नाव आहे . तिच्या लग्नाला फक्त ११ महिने झाले लग्न शेदुर्णी तेथे झाले होते. शिरसोली येथील अजय अशोक बारी (बुंधे) वय ३० असे तीच्या पतीचे नाव आहे. तो तेलंगणा राज्यात मनचगुरु येथे अँब्युलस चालक म्हणून शासकीय नोकरी करतो. दोन दिवसांपुर्वी तो गावी शिरसोलीत आला होता.
आज दि. १९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे रहात्या घरात वरच्या मजल्यावर प्राजक्ता बारी ही गळफास घेतल्या अवस्थेत आढळी तीने आत्महत्या केली की तीला गळफास दिला गेला यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र शेदुर्णी येथिल प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की, तिच्या सासरचे लोक दोन लाख रुपये हुंडा मागत होते. काही दिवसांपूर्वी तीन तोळे सोने दिले होते. या छळातूनच तिची गळफास देऊन हत्या करण्यात आली आहे. असा आरोप केला आहे.
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस काँ. ढवळे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पती व सासरे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माहेरच्या लोकांनी सांगितले की खुनाचा गुन्हा दाखल करा तर आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असी त्यांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here