जळगाव ः प्रतिनिधी
जळगावच्या माजी नगरसेविका शोभा बारी यांचे पुतणे बबलू बारी व सामाजिक कार्यकर्ते असलेला पुत्र अतुल बारी यांचे शिरसोली हे आत्याचे गाव. त्यांच्या आत्यांचे पती दशरथ बाबुराव अस्वार हे कोरोनाबाधित होते.जळगाव येथे नेण्यासाठी त्यांना १५ किलोमीटर अंतरासाठी पाच हजार रुपये भाडे एका रुग्णवाहिका चालकाकडून सांगण्यात आले होते. हा प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन बारी परिवाराने गावासाठी रुग्णवाहिका लोकार्पण केली.
इंधनाची रक्कम देऊन या रुग्णवाहिकेचा कुणीही लाभ घेऊ शकतो. रुग्णवाहिका लोकार्पण माजी सैनिक उत्तम बारी यांच्या हस्ते करण्यात आलेे.सरपंच प्रदीप पाटील (शिरसोली प्र.बो.), सरपंच हिलाल भील (शिरसोली प्र.न.), उपसरपंच श्रावण ताडे (शिरसोली प्र.न.), समाधान जाधव (शिरसोली प्र.बो.), ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे, प्रशांत काटोले, शिवदास काळे, शिवदास आडबल, विनोद भील, जयंत बारी, राजू बारी, रवि नेटके, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.