शिंपी समाजाचे महापौर जयश्री महाजन यांना निवेदन

0
66

जळगाव, प्रतिनिधी । समस्त गुजराल उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव द्या, शिंपी समाज जळगाव शहर, शिंपी समाज हितवर्धक संस्था पिंप्राळा, शिंपी समाज दादावाडी परिसर शाखा व जळगाव शहरातील सहयोगी समाजातर्फे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले.

गुजराल पेट्रोल पंप येथील नव्याने होत असलेल्या उड्डाणपुलाला वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नाव दयावे, असे निवेदन आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता महापालिकेत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समस्त समाज शिंपी समाज बांधवांच्यावतीने निवेदन जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष विवेक सचिव, चंद्रकांत जगताप, प्रिंपाळा शिंपी उपाध्यक्ष रूषिकेश कापुरे, समाज बाधंव जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कापुरे, अ भा शिंपी समाज उपाध्यक्ष मुकुंदराव मेटकर, मा अ भा युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, गणेश मेटकर, सुरेश सोनवणे, अनिल खैरनार, प्रविण कापुरे, दादा वाडी परिसर अध्यक्ष शैलेंद्र मांडगे, शिवदास आबा सावळे आदींनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here