Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»शासकीय सुटीमुळे वाळूतस्करांना होळी आणि धुलीवंदनाची मोठी सुवर्णसंधी
    यावल

    शासकीय सुटीमुळे वाळूतस्करांना होळी आणि धुलीवंदनाची मोठी सुवर्णसंधी

    saimat teamBy saimat teamMarch 30, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः प्रतिनिधी
    दि. २७ रोजी चौथा शनिवार व दि.२८ होळी आणि दि.२९रोजी धुलिवंदननिमित्त शासकीय सुटी आल्याने तसेच यावल तहसीलदार वगळता काही महसुल अधिकारी,कर्मचारी आणि अनेक तलाठी,सर्कल हे आपल्या मुख्यालयाठिकाणी राहत नसल्याची सुवर्णसंधी साधून वाळूतस्करांनी अवैध वाळू वाहतूक खुलेआम करून ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळवून मोठा उच्चांक गाठला. यावल पोलीस सुद्धा दिवस-रात्र बंदोबस्त करून सकाळी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान साखर झोपेत राहत असल्यामुळे वाळू तस्करांना पोषक वातावरण निर्मिती झाली होती तरी आता महसूल आणि पोलिस विभाग नेहमीचे शासकीय कामकाज करताना वाळूतस्करांविरुद्ध काय कडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
    यावल तहसील कार्यक्षेत्रात तसेच यावल व फैजपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कोळन्हावी डांभुर्णी किनगाव, मनवेल थोरगव्हाण साकळी,वड्री सातोद कोळवद,भालशिव बोरावल टाकरखेडा पिप्री, पाडळसे बामणोद भालोद आमोदा न्हावी फैजपुर, हिंगोंणा सांगवी परिसरात वाळू माती इत्यादी गौण खनिजाची अनेक ट्रॅक्टर, डंपर मालक-चालक अनधिकृतपणे सर्रास वाळू वाहतूक करीत आहे यात यावल तालुक्यातील अनेक नद्या-नाल्यातील वाळूचा लिलाव अधिकृतपणे झालेला नसताना अवैध वाळू वाहतूक होतेच कशी? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत बोरावल टाकरखेडा परिसरातून वाळू वाहतूक करणार्‍यां ट्रॅक्टर चालकाकडून एका मंदिराचे बांधकाम सुरू असल्याने संबंधित त्या ठिकाणी वाळूचे भरलेले ट्रॅक्टर थांबवून, अडवून प्रति ट्रॅक्टर दोनशे रुपये अनधिकृतपणे वर्गणी वसूल करीत आहेत हे सुद्धा संपूर्ण महसूल आणि पोलिस विभागाला एक आव्हान आहे,म्हणजेच अवैध वाळू वाहतूकदारांना ग्रामस्थांचासुद्धा पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.
    वरील शासकीय सुट्ट्यांचे निमित्त साधून यावल परिसरातील अवैध वाळू वाहतूक दारांनी(काही ट्रॅक्टर चालकांनी तर एका ट्रॅक्टरला २ ट्रॉली जोडून)खुलेआम रात्रीच्या वेळेस म्हणजे पहाटे दोन ते सहा वाजेच्या दरम्यान अवैध वाळू वाहतूक करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुसाट वेगाने पळवून मोठा गोंधळ घालत असतात यामुळे विकसित भागातील नागरिकांची सकाळची साखर झोपमोड़ होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील अनेक सर्कल आणि तलाठी(यावल तलाठी वगळता) हे आपल्या मुख्यालया ठिकाणी रहात नसल्याने तसेच पोलीस सुद्धा दिवस आणि रात्री उशिरापर्यंत गस्त घालून सकाळी दोन ते सहा वाजेच्या दरम्यान झोप घेत असल्याने अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर पाहिजे त्या सोयीच्या रस्त्याने सुसाट वेगाने धावत असतात तरी यावल महसूल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून यावल शहरात विकसित भागात वाळूचे ट्रॅक्टर येतात कुठून? आणि जातात कसे? याबाबत कडक निर्बंध लावून कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.