Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»शासकीय वाहनासह वाळूतस्करांची रंगली भजे,पोहा पार्टी
    यावल

    शासकीय वाहनासह वाळूतस्करांची रंगली भजे,पोहा पार्टी

    saimat teamBy saimat teamMarch 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : तालुका प्रतिनीधी
    शहरात आज सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे तसेच वाळूतस्करांची भजे आणि पोहा नाश्ता खाण्याची पार्टी झाली. यावेळी शासकीय वाहनासह ते कोण कोण कर्मचारी उपस्थित होते? याची प्रत्यक्षदर्शींनी पाहणी केल्याने यावल शहरात अनेक तर्क -वितर्क लावले जात असून, या बाबत प्रांताधिकारी व तहसीलदार खुलासा करतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.
    यावल येथील बस स्टँड जवळ तसेच जुन्या तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या जे.टी.महाजन व्यापारी संकलनात भजे पोहा शेव चिवडा नाष्टा पाण्याचे दुकान आहे या दुकानात आज सकाळी अवैध वाहतूक करणारे आणि वाळूची तस्करी करणारे यांची बहुसंख्येने कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून भजे,पोहा पार्टी झाली. यावेळी भजे दुकानापासून काही अंतरावर रस्त्यावर डिव्हायडर/दुभाजक असल्याने विरुद्ध दिशेने एक शासकीय वाहन सुद्धा पार्किंग केलेले होते. एवढ्या सकाळी शासकीय वाहन त्याठिकाणी कसे उभे होते यांनी रात्रीच्या वेळेस वाळू तस्करांवर कुठे आणि काय कारवाई केली? वाळू तस्करी करणार्‍यांची अर्थपूर्ण मैत्री कोणा कोणाशी आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
    भजे पोहा पार्टीत त्या शासकीय वाहनातील तालुक्यातील २त३ेजबाबदार कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले यामुळे तसेच यावल शहरासह परिसरात सर्रासपणे वाळू वाहतूक बिनदिक्कतपणे होतं असल्याने या सर्व प्रक्रियेत राजकीय सामाजिक प्रभावामुळे संबंधित अधिकारी हतबल झालेले दिसून येत आहेत,वाळू व इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली डंपर महसूल किंवा पोलिसांनी पकडले असता संबंधित शासकीय यंत्रणेवर मोठे राजकीय-सामाजिक दडपण येत असते, यामुळे बर्‍याच वेळा पकडलेली वाळूची वाहने नाम मात्र कारवाई करून महसूलला सोडून द्यावी लागतात ही यावल तालुक्यातील वस्तुस्थिती आहे. राजकीय प्रभावामुळे वाळू तस्कर कोणालाही घाबरत नसल्याने आमचे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही अशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. तरी प्रांताधिकारी कैलास कडलक,तहसीलदार महेश पवार,पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेवून नियोजन करून सापळे रचुन वाळू तस्करांना कायद्याची जाणीव करून द्यावी तसेच भजे पार्टीत कोण कोण सहभागी होते? याची चौकशी करून कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.