जळगाव ः प्रतिनिधी
राज्य शासनाने १४ जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शिवसेना महानगरतर्फे शासकीय कार्यालयांमध्ये २३ जानेवारी रोजी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यासाठी काल संध्याकाळी प्रतिमा भेट देण्यात आल्या.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १४ जानेवारी रोजी परिपत्रक काढून त्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा देखील उल्लेख केलेला आहे. त्यानुसार शनिवारी दिनांक २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याकरिता शहरातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शिवसेना महानगर तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा सदिच्छा भेट देण्यात आल्या. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, महानगरपालिकेमध्ये उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद याना शनिवारी २३ रोजी प्रतिमा देण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, नितीन बरडे, प्रशांत सुरळकर, अॅड राजेश पावशे, बाळा कंखरे, पुनम राजपूत, संजय सांगळे, प्रकाश व्यास, गजानन पाटील, विराज भोईटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.