जळगाव : साईमत चमूकडून
शेतकर्यांच्या भारत बंद हाकेला जळगाव शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम झाल्याचे दृष्य दिसले. तर शहरातील प्रमुख बाजारपेठेत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करण्यासाठी शहरात गटागटाने फेरफटकाही मारला. याशिवाय जामनेरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून अमळनेरात चक्काजाम करण्यात आला आहे. धरणगावातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. मलकापूरात नवजीवन एक्सप्रेस आंदोलकांनी काही काळ रोखली.
जळगाव शहरात सकाळी प्रारंभी मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्यात आली होती तर बरीच दुकाने बंद होती. महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी गटागटाने शहरातील प्रमुख भागात फिरून बंदचे आवाहन केल्यामुळे फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, दाणा बाजार, सुभाष चौक परिसरातील दुकाने पूर्णपणे बंद झाली. सेंट्रल फुले मार्केटमधील मैदानावर मुलांनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला.
दरम्यान, आकाशवाणी चौफुलीवर राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रीत येत ठिय्या आंदोलन केले. त्यात राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फारभाई मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अयाजअली नियाजअली, वाय.एस. महाजन सर, साहेलभाई पटेल, महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, कल्पिता पाटील, शिवसेनेच्या मंगला बारी, शोभा चौधरी, काँग्रेसच्या मंगलाताई पाटील आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. काही वेळाने कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जामनेरात कडकडीत बंद
जामनेर – कृषी कायदा बिल विरोधात महाविकास आघाडीतर्फे बंद करण्यात आलेल्या या बंदमध्ये शहरासह तालुक्यातील पहूर येथील सर्व व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
देशाचा पोशिंदा जगला तर आम्ही जगू, दि.२६ नोव्हेंबर पासून देशाचा पोशिंदा दिल्लीच्या तक्तावर आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा देत असून शेतकर्यांसाठी खोटा पुळका आणणार्या मोदी सरकारने दखल घेतली नाही. शेतकरी विरोधात काळा कायदा निर्माण केला असून याविरोधात देशात किसान क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्या आंदोलनात दिल्ली येथे शेतकरी बांधव थंडीत जुलमी सरकारचा थंड पाणी फवारा मारलेले पाणी जल तो अश्रूधूर सहन करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज पहूर येथे महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला. या कडकडीत बंदमध्ये महाविकास आघाडीचे शहर प्रमुख सुकलाल बारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेश पाटील, विभाग तथा पत्रकार गणेश पांढरे, वसीम शेख, इरफान शेख, उपसरपंच शाम सावळे, किरण पाटील, रवींद्र पांढरे, रमण शिरसागर, आशिष माळी, सुधाकर शिंगारे, भाऊराव गोंधळखेडे, अशोक जाधव, अजय जाधव, सलीम शहा, ग्रामपंचायतचे ईश्वर बारी, राजू पाटील, अमोल पाटील, संतोष गोंधनखेडा यांच्यासह महाविकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमळनेरात चक्काजाम आंदोलन
अमळनेर – केंद्र सरकारकडून दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या अमानुष वागणुकीच्या तीव्र निषेध करण्यासाठी व शेतकरी आंदोलनास पाठबळ देण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, अमळनेरचे आ.अनिल भाईदास पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष नगरसेवक मनोज पाटील, तालुकाध्यक्ष बी.के.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यातील युवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारला धारेवर धरत चक्का जाम आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी हर्षल जाधव (जिल्हासचिव युवक काँग्रेस), भूषण भदाणे (जिल्हा उपाध्यक्ष रा.वि.काँ.), श्रीकांत पाटील (युवा सेना जिल्हा उपप्रमुख), इमरान खटीक (जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी), गोविंदा बाविस्कर (जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी), महेश पाटील (युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अमळनेर), तौसिफ तेली (शहराध्यक्ष युवक काँग्रेस अमळनेर), सुनिल शिंपी (शहराध्यक्ष अमळनेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस), श्रीनाथ पाटील (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस), कुणाल चौधरी (शहरकार्याध्यक्ष युवक काँग्रेस), महावीर जैन (शहरउपाध्यक्ष युवक काँग्रेस), अलिम मुजावर (तालुकाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक सेल), जुबेर पठाण (शहराध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक सेल), राजू शेख (युवक काँग्रेस), अझहर सय्यद, शादाब तेली, समीर शेख, सनी गायकवाड (शहरकार्याध्यक्ष रा.वि.काँ), मयूर पाटील, अनिरुद्ध सिसोदे, मुन्ना पवार, शुभम बोरसे, अभिषेक धमाळ, कृष्णा बोरसे, गिरिश पाटील, भूषण सनेर, अमर पाटील, किशोर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.