जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काही भागात महापालिकेने खडडे बुजविले मात्र अनेक रस्त्यावर अजूनही खड्डे आहेत. खड्डयामुळे वाहनाधारकांना विविध व्याधी जडल्या आहेत. यामुळे काही ठिकाणचे रस्ते बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन व युवक बिरादरी तर्फे बुजविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ 22 सप्टेंबरला सकाळी दहाला होणार असल्याची माहिती बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुधा काबरा यांनी दिली.
शहरातील काव्य रत्नावली चौक ते आकाशवाणी चौक, शिरसोली नाका ते काव्य रत्नावली चौक, शिवकॉलनी परिसरातील रस्ते, आशा बाबा नगर, हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर या परिसरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत.
बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन नेहमी सामाजीक कार्यात अग्रेसर असते. वरील परिसरातील नागरिकांनी बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनकडे रस्तयावरील खड्डे बुजवून नागरिकांना होणारा त्रास कमी करा अशी मागणी केली होती. त्यानूसार फाउंडेशनने हा निर्णय घेतला आहे.
