शहरातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

0
15
शहरातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

जळगाव प्रतिनिधी । नवीन बस स्टॅन्ड परिसरातून आज ५ पाच हजार रुपये किंमत असेलेला मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील कृष्णराज हेमराज पाटील (वय-५२) रा.पाचोरा हे जळगावात एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतात. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात ते सात वाजेच्या दरम्यान पाचोरा येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले असता त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळून आला नाही. त्यांनी या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. फिरोज तडवी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here