जळगाव ः प्रतिनिधी
महापालिकेच्या थकबाकी पोटी सुरु असलेल्या गाळे सीलच्या कारवाईच्या विरोधात बुधवारी श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भीक मांगो आंदोलन केले. दरम्यान, आज गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु होणारे साखळी आंदोलन स्थगित केले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या गाळेधारकांनी दुपारी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत भीकमांगो आंदोलन केले. यातून जमा झालेले भीकेचे पैसे महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे.
दरम्यान,संध्याकाळी गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी राजस कोतवाल व तेजस देपुरा यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन महापालिकेच्या भूमिकेच्या विरोधात साखळी उपोषण करीत असल्याचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संसर्ग वाढीमुळे उपोषण न करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत उपोषण स्थगित केले आहे.