शहराचा ‘ना चेहरा बदलला ना मोहरा’, सत्ता मात्र बदलली!

0
18

जळगाव: विशेष प्रतिनिधी
गेल्या २०१८ ला झालेल्या महापालिका निवडणुकीची सूत्रे अर्थात भाजप कडून तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती.आणि २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या.तेव्हा महाजन जळगावकरांना विश्वास देत होते की, ‘‘तूम्ही आम्हाला महापालिकेत सत्ताद्या ,आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू ‘‘आणि इतकेच नाही तर आम्ही शहराचा विकास म्हणजे चेहरा-मोहरा बदलू शकलो नाही तर विधानसभेसाठी मते मागायला येणार नाही.
जळगावकर नागरिक सुज्ञ होते , काय हरकत आहे म्हणून त्यांनी महाजनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकली. आणि जळगाव महापालिकेत भजपाला भूतो न भविष्यती असे प्रचंड बहुमत मिळाले होते (७५ पैकी ५७) त्यानंतरम्हणजे २०१८ नंतर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या . शहराचा कोणताच विकास झालेला नसतांना किंबहुना कोणतीच विकासकामे दृष्टिपथास नसतांना जळगावकर मतदारांनी लागोपाठ दुसर्‍या वेळेस सुरेश दामू भोळेना निवडून दिले होते.
त्या महापालिका निवडणुकीला आता बरोब्बर अडीच वर्षे झाली असतांना विशेष शहराचा ना चेहरा बदलला ना मोहरा बदलला आहे . शहर आहे त्याच स्थितीत असून शहरातील रस्त्यांची पार वाट लागलेली आहे. धुळीने माखलेले व माखत चाललेले शहर असे या शहराचे चित्र आहे .आणि महापालिकेत सत्तांतर झाले आहे .
महापालिकेत शिवसेनेचे अवघे १५ मावळे आणि समोर सत्ताधारी भाजपचे ५७ गडी तरिही गनिमी काव्याने शिवसेनेने महापालिकेचा गड सर करून गिरीश महाजन यांना गारद केले आहे . विशेष म्हणजे भाजपातील महाजन आणि आमदार भोळे यांच्यावरील नाराजीचे जाहीर प्रदर्शन भाजप नगरसेवकांनी केले होते . शहरात कोणतेच विकास काम होत नाही , सभा -मिटिंग मध्ये आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, भोळे काय करतात ते सांगत नाहीत आणि महाजन त्यांचेच घोडे दामटतात . असे भाजपातील नाराजांचे आरोप होते .त्यात तथ्यही असावे . कारण शहरातील मतदारांना हा सारा खेळ डोळ्यासमोर आहे .
शहर भले ही खड्ड्यात गेले आहे पण आ.गिरीश महाजन यांनी त्यांचे स्थान मजबूत करण्याचे काम येथे केल्याचे दिसून येते . जिल्ह्यातील भाजपचे शक्ती केंद्र ‘‘वसंत स्मृती‘‘नव्हे तर आ. महाजन यांचे संपर्क कार्यालय‘‘जी एम फाउंडेशन‘‘ हे जाणीवपूर्वक करण्यात आले होते . सारी सूत्रे तेथूनच हलविण्यात येत होती असा नगरसेवकांचा आरोप होता . उल्लेखनीय की महाजन आता पुढची विधानसभा जळगाव मधून लढण्याची तयारी करीत असल्याचे व जामनेर मतदार संघ त्यांच्या सौभाग्यवती साठी सोडणार असल्याच्याही चर्चा होत्या. महापालिकेचे प्रमुख सत्ताकेंद्र ताब्यात आणि नगरसेवकांचे मोठे बळ पाठीशी असल्याने या चर्चा खर्‍याही वाटत होत्या.
परंतु … हा परंतु खूप महत्वाचा आहे . महापालिकेतील सत्ता हातून गेल्यानंतर या चर्चा चर्चाच राहणार आहेत . मात्र महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरवासीयांचा अपेक्षा उंचावल्या आहेत .सत्ता बदलली हे चांगलेच झाले .निदान आता श्रेय वादाचे राजकारण होणार नाही . असे लोकांचे म्हणणे आहे . कारण यापूर्वी शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला होता . तो मिळण्यास दोन वर्षे लागली , आलेला निधी दोन वेळेस परत गेला , त्यातही श्रेय वाद झाला. निधी कुठे खर्च करावा यावर राजकारण झाले . आता महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे आणि आ.गिरीश महाजन मागे पडणार आहेत .राज्यात सत्ता महाआघाडीची आणि महापालिकेतही त्यांचीच सत्ता परिणामी कोणतीच अडचण नसल्याने (निधी )कामे सुरू करणे अगत्याचे ठरणार आहे. जळगावकर नागरिक रस्त्यांमुळे हैराण आहेत ,आणि सर्वप्रथम सर्व शहरातील रस्त्यांची कामे सुरू व्हावीत ,रस्ते खाच-खळगे व खड्डे मुक्त व धुळ मुक्त व्हावेत हीच नागरिकांची अपेक्षा आहे.भाजपने प्रचंड बहुमत मिळवून सुद्धा मतदारांचा भ्रमनिरास केला आहे . तो कित्ता नव्या सत्ताधार्‍यांकडून अपेक्षित नाही .
भाजपच्या विद्यमान आमदार(सुरेश भोळे) यांची दुसरी टर्म शहरवासी अनुभवत आहेत . आमदार म्हणून शहराप्रति त्यांचे योगदान काय? हा प्रश्न ही आहेच.भजपाला ‘‘जय श्रीराम ‘‘करणारे भाजपाचेच सभागृह नेते माजी महापौर ललित कोल्हे म्हणाले होते की‘‘येथे कमांडरच नाही’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here