मुंबई : प्रतिनिधी
महिन्याभराच्या आजारपणानंतर शरद पवारांची कामाला सुरुवात केली आहे. आजारपणानंतर ते आता ॲक्शन मोडवर आले आहेत. तसेच १ जूनपासून ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणार आहेत. १ जून रोजी शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांकडून कामाचा आढावा घेणार आहेत. यामुळे आता त्यांनी पुन्हा बैठकांच्या फैरी सुरू केल्या असल्याचं बोललं जात आहे.

१ जून रोजी शरद पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून कामाचा आढावा घेणार असून, राजकीय परिस्थितीवर चर्चाही करणार आहेत. इतकंच नाहीतर शरद पवार हे राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत काय सूचना देतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असून यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांचीही बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
