राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना ३० मार्च रोजी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता. ते काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. त्यानंतर ३ एप्रिलला त्यांना घरी सोडण्यात आले होते.
त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र काही दिवसांनंतर पवार यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते.