शरद पवारांची टीका सकारात्मक पद्धतीने घ्या : नवाब मालिक

0
65

मुंबई : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसची (Congress) आजची अवस्था एखाद्या हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारासारखी असल्याचे पवार म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पवारांच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण दिले आहे . देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची पवारांची ही भूमिका असल्याचे ते म्हणाले. त्या संदर्भात त्यांनी केलेली टीका काँग्रेसने सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे,असेही मलिक म्हणाले.

दरम्यान शरद पवारांच्या टीकेला उत्तर देत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले होते.

शरद पवारांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत नाही. शरद पवारांच्या विचाराने काँग्रेसच्या विचारांचे नुकसान होणार नाही. पण राज्य घटनेशी, मूलभूत तत्वांशी निगडीत विचारांचे आहेत त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावे, बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here