Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शनिवार, रविवारी ब्लॉकमुळे ८ रेल्वे गाड्या रद्द, तर दोघांचे मार्ग बदलले
    जळगाव

    शनिवार, रविवारी ब्लॉकमुळे ८ रेल्वे गाड्या रद्द, तर दोघांचे मार्ग बदलले

    saimat teamBy saimat teamMarch 12, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-कसारा खंडात शनिवार, रविवारी (दि.१३ व १४) असे दोन दिवस रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ८ गाड्या रद्द, तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
    शनिवारी रात्री २ वाजेपासून सकाळी ७.२५ वाजेपर्यंत तीन स्टेशनवर हा ब्लॉक असेल. त्यात शनिवारी रात्री २.१५ वाजेपासून ते सकाळी ७.१५ पर्यंत खडावली आणि वाशिंद रेल्वे स्टेशनदरम्यान क्रॉसिंग गेट ६१ मध्ये आरएच गर्डरचे काम केले जाईल. पहाटे २.२५ ते सकाळी ७.२५ या वेळेत आसनगाव आणि आटगाव स्टेशनदरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटचे आरएच गर्डरचे काम होईल. तर पहाटे २ ते सकाळी ४.३० पर्यंत शहाडमध्ये एफओबीचे गर्डर टाकले जातील. या कामांमुळे ८ विशेष रेल्वे गाड्या रद्द, तर दोघांच्या मार्गात बदल आहे. याते अनुक्रमे डाउन मुंबई-अदिलाबाद (दि.१२), अप अदिलाबाद-मुंबई (१३ मार्च), डाउन मुंबई-सिकंदराबाद (दि.१४), अप सिकंदराबाद-मुंबई (दि.१३) डाउन मुंबई-नांदेड (दि.१४), अप नांदेड-मुंबई (दि.१३), अप जबलपूर-कोईमतूर (दि.१३) आणि डाउन कोईमतूर- जबलपूर (दि.१५).
    डाउन स्पेशल ट्रेन येथे थांबवणार
    कल्याण आणि टिटवाडा दरम्यान आणि निलजे स्टेशनमध्ये मुंबई-हावडा (दि.१४), एलटीटी-प्रयागराज (दि.१४), एलटीटी-गोरखपूर (दि.१४) आणि मडगाव-नागपूर विशेष गाडी १३ मार्चला थांबवण्यात येईल.
    रि-शेड्युलिंगच्या दोन गाड्या
    मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील अमरावती-मुंबई ही गाडी १३ मार्चला अमरावती स्टेशनपासून तीन तास रि-श़ेड्युलिंग करण्यात येईल. अप गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्चला गोंदिया स्टेशनपासून ३ तास विलंबाने सुटेल.
    दोन विशेष गाड्यांचे मार्ग बदलण्याचा निर्णय
    अप गोरखपूर-एलटीटी विशेष गाडी गोरखपूर स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव-वसई रोड मार्गे एलटीटीला जाईल. हावडा-मुंबई विशेष गाडी हावडा स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव, वसई रोड मार्गे एलटीटी गाठेल. या दोन्ही गाड्यांना भिवंडी रोड येथे थांबा दिला आहे.

    इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान १ ते ३ तासांपर्यंत थांबवण्यात येईल. यात नागपूर-मडगाव गाडी (दि.१३ मार्च), हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम (दि.१३), फिरोजपूर-सीएसएमटी (दि.१२), नागपूर-सीएसएमटी (दि.१३) या गाड्यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.