वॉटरग्रेस कंपनीचा कारभार संशयास्पद; महापौरांपाठोपाठ उपमहापौरांचेही आयुक्तांना पत्र

0
24

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील साफसफाईचा ठेका असलेल्या वॉटरग्रेस कंंपनीकडून पूर्ण क्षमतेने काम होत नाही.वजन वाढवण्यासाठी माती भरली जात आहे. अनेक वाहने बंंद आहेत त्यात वॉटरग्रेस कंपनीने पोटठेका दिल्याबाबत चर्चा आहे. त्यामुळे मक्तेदाराचे काम शंंकेला वाव देणारे आहे. अटी व शर्तींचा भंंग झाला असेल तर त्याची दखल घ्यावी अशी सूचना उपमहापौर सुनील खडके यांंनी केली आहे.
महापौर भारती सोनवणे यांच्या पाठोपाठ उपमहापौर खडके यांंनीदेखील साफसफाईच्या ठेक्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त सतीश कुलकर्णी यांंना पत्र दिले आहे. बर्‍याच दिवसांपासून नगरसेवक, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांच्या समक्ष पाहणीत मक्तेदाराकडून साफसफाईचे काम समाधानकारक होत नसल्याचे दिसते.
प्रभागातून यासंदर्भात तक्रारी प्राप्त करणे, कचरा संकलन करण्याऐवजी ट्रॅक्टरमध्ये माती भरून वजन वाढवण्यात येत आहे. अशा पद्धतीने अटी व शर्तींचा भंग केला जात असल्याचे पत्रात म्हटले आहे.शहरात घंटागाड्या पुरेशा संख्येने दररोज उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.अनेक घंटागाड्या बंद असल्याने काम पूर्ण क्षमतेने पार पाडले जात नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.उपमहापौर खडके यांनी दिलेल्या पत्रात वॉटरग्रेस कंपनीने इतर कंपनीला उपठेका दिल्याची चर्चा असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here