Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»वृध्द महिलेचा बसखाली चेंगरून जागीच मृत्यू
    क्राईम

    वृध्द महिलेचा बसखाली चेंगरून जागीच मृत्यू

    saimat teamBy saimat teamFebruary 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    येथील बसस्थानकात बस रिव्हर्स घेत असतांना अचानक मागच्या चाकात आल्याने कानळदा येथील (अंदाजे वय ६०) वृध्द महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली आहे.
    याबाबत माहिती अशी की, आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मनमाडहून भुसावळकडे जाणारी बस (क्र.एम.एच.१४-बीटी.०५६४) वरील चालक बसला फलाट क्र.१६च्या समोर रिव्हर्स घेवून लावत असतांना बसचा धक्का लागून देवकाबाई नारायण सपकाळे या पडल्या व बसच्या मागील चाकात आल्या. या अपघातात देवकाबाई यांच्या डोक्यावरुन मागचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला व त्या जागीच गतप्राण झाल्या. या घटनेने काही वेळ बसस्थानकात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घटनेचे वृत्त कळताच बस स्थानकातील अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. देवकाबाई यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलिस स्थानकाचे पो.नि. विलास शेंडे यांनी घटनास्थळी पोहोचत अपघाताची माहिती जाणून घेतली व घटनास्थळाचा पंचनामा करण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिल्या.
    दरम्यान, तालुक्यातील कानळदा येथील रहिवासी देवकाबाई नारायण सपकाळे या दोन महिलांसह चाळीसगाव येथे साखरपुड्याच्या कायक्रमाच्या निमित्ताने गेल्या होत्या. सकाळी त्या जळगाव येथे परतल्या होत्या. जळगावहून आपल्या मुळगावी कानळदा येथे जाण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या आणखी दोन सहकारी महिलांसह कानळद्याकडे जाणार्‍या बसचा त्या शोध घेत असल्याचे बसस्थानकातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.