यावल ः प्रतिनिधी
रावेर येथे एका कोविडने मृत झालेल्या वृद्ध परिचित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याने निंभोरा (ता.रावेर) येथील युवा रसिक मंडळाने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी सुनील कोंडे, डॉ.एस.डी. चौधरी, धीरज भंगाळे, हर्षल ठाकरे यांच्यासह रावेर येथील दोन सहकार्यांंनी मिळून अंत्यसंस्कार पूर्ण केले.
समाजात अशावेळी तरुणांनी सुरक्षित साधनांचा वापर करून पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन निंभोरा येथील जागरूक तरुणांनी केले होते. याला पाठिंबा देत रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील प्रसिद्ध डॉ.एस.डी.चौधरी यांनी हे आवाहन सोशल मीडिया गृपवर टाकला. याला प्रतिसाद देत रावेर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. रावेर व परिसरातील एखाद्या कोविड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही नातेवाईक पुढे येत नसेल तर या समाजसेवकांशी संपर्क साधावा. प्रदीप महाराज पंजाबी खिर्डी-७८८७९८७८८८, धीरज भंगाळे निंभोरा बु.८२७५२७०४०४, हर्षल मंगला, नामदेव ठाकरे निंभोरा बु॥ ८७९३४२४१४७, डॉ.एस.डी.चौधरी निंभोरा बु॥ ९८८१६७४१६१, सुनील कोंडे निंभोरा बु॥ ९०११२६१३४५, राज खाटीक निंभोरा बु॥ ८३७८८९८६७३, शेख इद्रीस खिर्डी खुर्द ९६५७९१५०७४, मोरेश्वर सुरवाडे रावेर, विनायक जहुरे-खिर्डी ९३७०५८७०७३, प्रभाकर महाजन खिर्डी खुर्द, चंद्रकांत भंगाळे चिनावल, दिलीप वैद्य रावेर, चेतन भंगाळे, विलास ताठे कुंभारखेडा ९३७०८६४२७६, चंद्रकांत विचवे, रावेर-९८८१६६९८१२, गौरव काटोले निंभोरा बु॥ ७५०७४ ०१०८४, सागर महाले ९६३७७३०३५, मोहन मोरे ७६२०७३५८५५, दीपक पाटील ९४२१०९५०५०, मिलन कोंडे ८३०८८११७११, भिमराव कोचुरे ७५०७८९३६५२, गुणवंत पाटील खिर्डी ९८२३९७८२५०, शरद चौधरी, मिलन कोंडे, दस्तगीर खाटीक ९५९५०१२९२६, दिनेश महाजन (पिन्टु माळी) मो.९०२१७३४६७२, साबीर बेग खिर्डी खुर्द, ज्ञानेश्वर महाजन ऐनपूर ९९२२०१२९७९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निंभोरा येथील युवा रसिक मंडळ, खिर्डी येथील समाजसेवी संस्था तत्पर फाऊंडेशन, म.रा.पत्रकार संघ रावेर तालुका या संस्थेने केले आहे.