वीज वितरणचाच्या अभियंताचे दुर्लक्षमुळे ट्रांसफार्मरला लागली आग

0
26

कजगाव ता.भडगाव, प्रतिनिधी । कजगाव विज वितरण च्या दुर्लक्ष मुळे कजगाव येथील शांती नगर या गजबजलेल्या परिसरातील उघड्या ट्रान्सफॉर्मर ला आग लागल्याने परीसरात मोठी घबराट पसरली होती प्रसंगी परीसरातील काहि तरुणांनी पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझवली या नंतर काहि वेळाने विजवितरण चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले तरुणांनी समयसूचकता दाखवली नसती तर गजबजलेल्या या भागात मोठा अनर्थ घडला असता.

उघड्या ट्रान्सफॉर्मर मुळे  नागरिकां सह लहान बालक यांचे जिव धोक्यात आले असूनही या बाबीकडे लक्ष दिले जात नसल्याने या खात्या विषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे सविस्तर वृत्त साऱ्याच दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर देखील या खात्याने कोणतीहि सुधारणा न केल्याने नागरिका मधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

येथील स्टेशन रोड वरील शांती नगर भागातील गजबजलेल्या चौकात विज वितरण कंपनी ने ट्रान्सफॉर्मर बसविला आहे मात्र या ट्रान्सफॉर्मर चे सारे  फ्युज हे पूर्णपणे मोकळे पडले आहेत विजे च्या साऱ्या केबल जमिनीवर लोंबल्या आहेत मुख्य चौक नेहमीच गर्दी ने गजबजलेल्या या चौकात मोठी वर्दळ असते लहान मुलांचे सहज हाथ पोहचतील असं जमिनी लगत हा सारा पसारा खुला पडला आहे त्यातच साऱ्या केबल या जमिनीवर लोंबकळत आहेत या ठीकाणी गुरेढोर च देखील वावर आहे या  ओपन पसाऱ्याला दि.२ च्या सायंकाळी आग लागली आग लागताच या भागात एकच धावपळ सुरू झाली योगायोगाने या चौकात तांदुळवाडी येथील रहिवासी शिक्षक प्रशांत पाटील हे धाडसाने पुढे सरसावत आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच हनिफ मण्यार,दिलीप पवार,निलेश पाटील,नीरज धाडीवाल हे तरुण धावत येत माती व पाण्याचा सहाय्याने आग विझवली या नंतर सार शांत झाल्यानंतर विजवितरण चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदर प्रकारामुळे या भागातील रहिवासी मध्ये घबराट पसरली आहे

विज वितरण च्या अभियंता चे  अक्षम्य दुर्लक्ष
कजगाव या गावातील सारेच ट्रान्सफॉर्मर हे उघडे पडले आहेत हा सारा उघडा पसारा अपघातास आमंत्रण देत असल्या नंतर हि या खात्याचे अभियंता हे सारे उघडया डोळ्यांनी पहात आहेत याच उघड्या ट्रान्सफॉर्मर च्या आगीने मोठा अनर्थ येथे घडला असता वेळीच तरुण धावत जात आग विझवल्या मुळे मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here