जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात बंद,रद्द झालेले मयत झालेले वारस न लागलेले अशा स्वस्त धान्य दुकान दुकानाचे जाहीरनामे जिल्हा प्रशासनाने काढले असून मात्र विस्तारित भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्याभागात नविन दुकानं शासनाने निविदा काढून जाहीरनामे काढावे करावे या मागणीसाठी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात जुने बंद पडलले स्वस्त धान्य दुकाने जाहिरनामे काढून प्रक्रिया सुरू असून मात्र सुधारित विस्तारित भागात नवीन दुकाने काढण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाहीत त्या बाबतीत नविन दुकाने सुरु करावेत तसेच कोरोनाची तिसरी लाट पाहता उद्योगधंदे कामधंदे सध्या तरी अद्यापही सुरू नसल्याने शिवभोजन थाळ्यात वाढ करावी यासाठी आज मंत्रालयात भुजबळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा सचिव भारत मोरे महानगर उपाध्यक्ष प्रसाद बनसोडे नरेंद्र मोरे किरण अडकमोल अनिल लोंढे अक्षय मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.