जळगाव : प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वेतील निवृत्त अधिकारी पद्माकर नाईक हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मनोज भादूपोता यांनी करून दिला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, शाळेचे प्राचार्य गणेश पाटील समन्वयिका का संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व कार्यक्रमाचे प्रमुख पद्माकर नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी एन.सी.सी परेड सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व योगासनाचे विविध प्रात्यक्षिक मंजुषा भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. विधी किनगे या विद्यार्थिनीने एरियल सिल्क चे प्रात्यक्षिक दाखविले. आर्या चौधरी हिने देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले. तसेच संगीत शिक्षिका स्वाती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर पद्माकर नाईक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शाळेचे प्राचार्य गणेश पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रवीण पाटील, सुनंदा मिश्रा, ज्योती देशमुख, योगिता कासार हे कार्यक्रमाचे प्रमुख होते. सोहम कुलकर्णी,नीतू मुंदडा, पलक कानडे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
