जळगाव ः प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शैलेंद्र राजपूत,मुख्याध्यापक हेमराज पाटील सर,समन्वयिका वैशाली पाटील उपस्थित होते.
वर्गशिक्षक सचिन गायकवाड, आकाश शिंगाणे, दिपाली सहजे, योगेश रत्नपारखी, गणेश वनडोळे, वैभव काष्टे, उमेश पाटील इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शब्द सुमनाने स्वागत करुन विद्यार्थ्यांची ऑक्सी मिटर व थर्मलगनच्या साह्याने तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना विविध सूचना देऊन त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक हेमराज पाटील सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असल्याने त्यांना वर्गात बसवून तासिकेच्या स्वरूपात अध्ययन-अध्यापन करण्यात आले. मुलांनी सोबत सॅनिटायझर, तोंडाला मास्क,स्वतंत्र डबा व पाण्याची बाटली तसेच एका बेंचवर एक विद्यार्थी अशा स्वरूपाची स्वतः काळजी घेत नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेत एक आदर्श वागणुकीमधून दाखवून दिला. शाळेत विद्यार्थ्यांना बघून शिक्षकांनासुद्धा खूप आनंद झाला तसेच या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांना विद्यार्थी डोळ्यासमोर प्रत्यक्ष शाळेत येतांना बघून मनस्वी आनंद होत होता.