जामनेर (प्रतिनिधी):- अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधु पित्यानी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ शोधणे सुरू करण्या अगोदर फक्त एक वेळेस तुम्ही जिथे राहत असत त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कोर्टात एक वेळेस फेर फटका मारून या आणि मग घरी येऊन विचार करा की नेमके कसे स्थळ तुम्हाला पाहिजे तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत स्थळ तुम्हाला हवे की सर्वसाधारण असले तरी चालेल परंतु चांगली माणसे हवीत, याचा विचार मुलामुली पालकांकडून आवश्य व्हावा.
सध्या कोर्टात गुन्हेगारांपेक्षा जास्त घटस्फोट घेणाऱ्या मुला-मुलींची संख्या जास्त दिसायला लागली आहे, थोडं खोलात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर घटस्फोट का हवा आहे तर खूप मजेशीर उत्तर मिळतात मुलगा व मुलीकडून, मागच्या वर्षी लग्न झालेल्या जोडप्याला जज साहेबांनी विचारले तुमच्या लग्नाला किती वर्षे झालीत व तुम्ही किती काळ सोबत होते, त्यावर दोघांचे उत्तर होते आमचे मागील वर्षी लग्न झाले व आम्ही 2 महिनेच एकत्र होतो, दोघे ही खूप शिकलेले त्यात मुलगा प्रायव्हेट जॉब ला चांगल्या पोस्ट वर तर मुलगी शासकीय जॉब ला, जज साहेबांनी विचारले मग तुम्हाला वेगळे का व्हायचे आहे- त्यावर दोघांचे उत्तर होते आमचे विचार जुळत नाही, मुलीच्या तोंडून हे उत्तर अपेक्षीत नव्हते. या मधे आई वडीलांचे संस्कार कमी पडले का? उत्तर नाही! पण आपण थोड भुतकाळात डोकावल तर उत्तर नक्की मिळेल,एक वेळ होता आपल्या आई-वडिलांची लग्न झालीत तेव्हा त्यांना मुलगा किंवा मुलगी आवडते का हे ही विचारले जायचे नाही, घरातल्या मोठ्या व्यक्तींनी ठरवले तर विवाह होत असत, आणि ते विवाह शेवट पर्यंत टिकत होते आगदी मरे पर्यंत मग आज च्या मुला-मुलींना इतके स्वातंत्र्य असल्यावर ही वेळ का येत आहे, अजून एक गोस्ट प्रकर्षाने जाणवते की, गरीब कुटुंबातील व हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबातील मुला-मुलींचे भांडणे कोर्टात आलेली दिसत नाहीत,या विकृत विचाराने सधन कूटुंबिय जास्त त्रस्त झाली आहेत. कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी जास्त जोडपे असतात ते एकतर खूप शिकलेले, लग्नाच्या वेळी अवास्तव मागण्या केलेली व त्या पूर्ण न होऊ शकला मुळे कोर्टात येणारी मंडळी, मुलाच्या बापाकडे खूप प्रॉपर्टी होती म्हणून आमची मुलगी सुखात राहील म्हणून आम्ही मुलगी दिली. परंतु जावई व्यसनी आहे तो आता मुलीला रोज त्रास देतो .म्हणून घटस्फोट, जावाईला लाख भर पगार आहे परंतु शहरात मोठा फ्लॅट किंवा गाडी घ्यायची आहे म्हणून मुलीला सासुरवास केला जातो ,तिचा छळ केला जातो म्हणून घटस्फोट हवा, दोन चार महिने सासरी राहिलेली मुलगी जिच्या अंगावरची हळद ही निघालेली नसते, मुलगी सुखात राहावी म्हणून आपले सर्वस्वी पणाला लावून देणारा बाप जो आपल्या मुलीचे लग्न लावून देताना पार भिकेला लागतो ,तो बाप आणि पोर जेव्हा कोर्टात येते त्या वेळेस डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही, म्हणून मुलाचे असो वा मुलीचे स्थळ शोधताना माणसे चांगली शोधा, पैसे, प्रॉपर्टी पाहू नका, मुलगा टेम्पररी नोकरीला असलेला असो की व्यवसाय करणारा फक्त त्याच्या मनगटात जोर असलेला हवा, आपल्या मुलीला दोन वेळचे खाऊ घालून सुखात ठेवणारा असावा, नाहीतर महाल विकून झोपड्यात येणारे ही बहाद्दर समाजात आहेत. त्यांना वेळीच ओळखा, मुलाच्या परिवारा कडे किती प्रॉपर्टी आहे हे पाहण्या पेक्षा तो मुलगा स्वतःच्या हिमतीवर काय करू शकतो हे पारखा, होतकरू, कष्ट करणाऱ्या मुलगा असेल आणि गरीब असेल तरी असे स्थळ हातचे जाऊ देऊ नका नक्कीच तेथेच तुमची मुलगी ही सुखात राहील. मुलामुलीच्या आई वडिलांनी नक्कीच विचार करावा.