Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»विमानसेवेला वाढता प्रतिसाद ; डिसेंबर महिन्यात १ हजार प्रवाशांनी घेतला सेवेचा लाभ
    जळगाव

    विमानसेवेला वाढता प्रतिसाद ; डिसेंबर महिन्यात १ हजार प्रवाशांनी घेतला सेवेचा लाभ

    saimat teamBy saimat teamJanuary 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.प्रवाशांची संख्या जुलै २०२०च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात तब्बल सहापटीने वाढली आहे.उडान-२ या योजनेंतर्गत सप्टेंबर २०१९ ला सुरू झालेल्या विमानसेवेचा आतापर्यंत सुमारे २१ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे विमानसेवेच्या नकाशावर जळगाव शहराचा बिंदू अधिक ठसठशीत होण्याकडे जळगाव विमानतळाची वाटचाल सुरू असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकारांमध्ये व्यक्त केली जात आहे.
    शासनाच्या उडान-२ योजनेंतर्गत जळगावातून अहमदाबाद व मुंबई या दोन शहरांना अनुक्रमे आठवड्यातून सहा व पाच दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली होती. ती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडीच ते तीन महिने बंद ठेवल्यानंतर पुन्हा सप्टेंबर २०२०मध्ये सुरू झाली. अहमदाबादसाठी आठवड्यातून तीन दिवस व मुंबईसाठी केवळ एक दिवस सेवा सुरू आहे. जुलैत जेव्हा विमानसेवा बंद करण्यात आली तेव्हा त्या महिन्यात अवघ्या १६४ प्रवाशांनी जळगावातून विमानाने प्रवास केला होता. डिसेंबर महिन्यात विमानसेवेचा लाभ घेणार्‍यांच्या संख्येने हजाराचा टप्पा पार केला आहे. कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे बहुतांश जण लांब पल्ल्याचा प्रवास करणे टाळत आहे. कोरोना निवारण झाल्यावर प्रवासी पटीने वाढतील.
    कोरोना काळात घेतली काळजी
    कोरोना काळ सध्या सुरू आहे. अजूनही पूर्णत: त्याचा धोका टळलेला नाही. म्हणून विमानतळावर अधिक सतर्कता बाळगली जाते आहे. आता हळूहळू विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे चित्र गेल्या महिन्याभरापासून समोर आले असून ते दिलासा देणारे आहे, असे म्हणावे लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.