जळगाव, – शासनाकडील 2 ऑगस्टच्या आदेशान्वये नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे निर्बध लागु असुन इतर जिल्ह्यात निर्बध शिथील करण्यात आले आहे. नाशिक विभागाचा विभागीय लोकशाही दिन दिनांक 11 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागातील दहा विभागप्रमुख यांचे उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 2 ऑगस्ट, 2021 च्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात निर्बध/सुचना निर्गमित करण्यात आल्याचेही श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.