विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजीच्या सात विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखतीव्दारे निवड

0
39

जळगाव : प्रतिनिधी
कोविड-१९च्या आपत्ती काळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची गुजरात राज्यातील दहेज येथील नोसिल लिमिटेड कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीव्दारे निवड करण्यात आली.
विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत गेल्या २५ वर्षांपासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. या संस्थेत शिकणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीव्दारे नोकरीची नामांकीत कंपनीमध्ये संधी मिळाली आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रार्दूभाव लक्षात घेता परिसर मुलाखतीचे आयोजन होऊ शकत नसल्याने विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग ण्ड प्लेसमेंट कक्षाच्या विनंतीवरुन नोसिल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी, सहायक व्यवस्थापक श्रीराम कुलकर्णी आणि मनुष्यबळ व्यवस्थापक सुमित हैबत यांनी ऑनलाईन मुलाखतींचे आयोजन केले होते.
या मुलाखतींमधून केमिकल टेक्नॉलॉजीचे कुणाल भुत्ते, राजू मालेकर, भावेश जाधव, हर्षल पाटील, अमोल राठोड, मनीष मुन आणि शंतनु पाटील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना वार्षिक दोन लाख चाळीस हजार रुपयांचे पॅकेज पहिल्या वर्षी आणि दुसर्‍या वर्षापासून तीन लाख रुपयांचे पॅकेज कंपनीकडून देण्यात येणार आहे.
एकूण २३ विद्यार्थ्यांनी या मुलाखतीमध्ये सहभाग नोंदविला होता. या मुलाखतीचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ.उज्वल डी. पाटील आणि श्री.राजकुमार शिरसाम यांनी केले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, आणि संस्थेचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here