जळगाव, प्रतिनिधी । ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नवीन कानळदा रोडवर रात्री राधाकृष्ण नगरात वडाचे झाड तोडण्यात आले आहे, परंतु त्याचे खोड व मूळे येथेच असल्यामुळे रात्री 11 वाजेच्या सुमारास चारचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली.
वाहन चालक अतुल शिरसाळे हे आपले काम आटोपून घरी जात असताना रात्री अंधारात त्या वडाच्या खोडावर गाडी चालविली गेली याने मात्र गाडीचे भरपूर नुकसान झाले सुदयवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. यावेळी येथील नागरिक ही मोठ्या प्रमाणात एकत्र झाले होते , या वडाच्या झाडाचे खोड भरपूर दिवसापासून रस्त्यावर बाहेर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे, या वडाच्या झाडाजवळ नगरसेवक दिलीप पोकळे यांचे कार्यलय आहे , त्यामुळे नागरिक त्यांच्याकडून काय आपेक्षा ठेवतील.