Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वादग्रस्त अतिक्रमणावर महापौरांचा असाही ‘सर्जिकल स्ट्राईक’
    जळगाव

    वादग्रस्त अतिक्रमणावर महापौरांचा असाही ‘सर्जिकल स्ट्राईक’

    saimat teamBy saimat teamJanuary 21, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    रस्त्यावरील रहदारीसाठी अडथळा ठरत असणारे गणेश कॉलनीतल्या ख्वाजामिया चौकातील अतिक्रमण आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हटविण्यात आले. तगड्या पोलीस बंदोबस्तासह महापौर, आयुक्त व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती झालेल्या कारवाईने या चौकाचा श्वास मोकळा झाला आहे.
    सविस्तर वृत्त असे की,शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमण आज पहाटे महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. दोन्ही अतिक्रमण हटविल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
    गणेश कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन गुरुवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात आले. सकाळी साडेपाच वाजताच महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे पोलीस फौजफाट्यासह पोहचले.
    यानंतर मनपाच्या दोन कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी दुवा पठण केली. यानंतर मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने ते अतिक्रमण हटविण्यात आले. ख्वाजामियाँ दर्ग्याच्या बाहेर असलेले जुने लोखंडी गेट देखील मनपाने महापौरांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    नगरसेविका दीपमाला काळे यांनी गणेश कॉलनीच्या मुख्य चौकातील अतिक्रमण काढावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी यासाठी आंदोलन देखील केले होते. याची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.