वातावरण बदलाचा परिणाम; मजूरही मिळेना, शेतकरी हवालदिल

0
9

नाशिक, प्रतिनिधी । कांदा पिकवण्यात अग्रेसर असलेल्या कळवण तालुक्यातील अभोणा परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी यंदाही नेहमीप्रमाणे कांदा लागवडीवर भर दिला असला तरी अवकाळी पावसाने कांदा रोप जमिनीतच सडल्याने अर्धवट कांद्याची लागवड करून शेतकरी वर्ग दुसऱ्या टप्प्यातील कांदा रोपाची वाट बघत असल्याचे चित्र असतांना मध्येच वातावरण बदलाने शेतकरी हवालदिल झाला आहे पहिल्या टप्यातील रोपांनवर करपाने धाव घेतल्याने पूर्ण क्षेत्रात कांदा लागवड होती का नाही तर महिन्यानंतर सर्वत्र अपूर्ण कांदा लागवडीची लगबग सुरू आहे . तालुक्यातील बऱ्याचशा शेतकर्यांची कांदा लागवड झाली आहे तर काहींची अंतिम टप्प्यात आहे.

अभोण्यासह,वंजारी,कुंडाणे,विठेवाडी,कळमथे,कुंडाणे,भगुर्डी,दत्तनगर,गोसराणे,बार्डे,बेलबारे,मोहमुख,आंबुर्डी, ओझर, तिऱ्हळ , जामशेत , पळसदर, मोहपाडा , देवळी , बिलवाडी आदि परिसरात कमी प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे. नातेवाईकांकडे कांदा रोपे उरली असल्यास तीही मागून आणुन लागवड करण्यावर काही शेतकर्यांचा भर आहे.सध्या शेतकऱ्यांपुढे दोनच मुख्य प्रश्न असुन एक म्हणजे लागवडीसाठी मजुर व दुसरे म्हणजे विजेची उपलब्धता. कारण कांदा लागवड करताणा रोपास लगोलग पाणीपुरवठा करावा लागतो.त्यामुळे मजुर मिळवण्या बरोबरच लोडशेडिंगच्या वेळेचा समन्वय जुळवून आणण्याची अवघड कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.ग्रामीण भागातील मजुर वर्गही आता चाणाक्ष झाला असुन तो रोजंदारी कामास ईच्छुक नसुन मक्ता घेऊन काम पुर्ण करण्याची नविनच पद्धत आता रूढ होत आहे.एकंदरीत सर्वत्र कांदा लागणचेच वातावरण व तेच विषय चर्चेला आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here