विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सर्वत्रच सध्या थंडीची लाट आठ दिवसांपासून वाढत चालल्यामुळे लहान मोठ्यासह चिमुकल्यांनाही सर्दी, पडसे, घशाचे विकार व थंडी तापाच्या रुग्णांमध्ये सोयगाव तालुक्यातील गावोगावी झपाट्याने वाढ होत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पुन्हा एकदा सतर्क राहावे लागेल. वातावरणातील चढउतारामुळे सर्वत्र रुग्ण धास्तावले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मागील महिन्यात थंडीची सौम्य लाट होती. ती आता गेल्या आठ दिवसांपासून पासून उच्चांकच गाठताना दिसते. त्याचा शहरी व ग्रामीण भागातील आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होताना दिसतो. पहाटे पहाटे धुके पडणे, ढगाळ वातावरण तयार होणे, सूर्यदर्शन न होणे झाले तर ते अति तीव्र असणे यामुळे लहान बालक व वृद्धांना या वातावरणाचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षापासून करोना या आजाराने संपूर्ण जग भयभीत झाले आहे.