वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने पाण्याच्या पातळीत वाढ

0
8
वाघूर धरण परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी । वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहे व त्याद्वारे 13377 कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे, तरी कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये. ही विनंती कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे.

काल शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आज रविवारी धरणाचे ४ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले आहे. धरणातून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मागील महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेले अनेक दिवस जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण ओवरफ्लो झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here