वाघुर धरणाचे सहा दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
14
वाघूर धरण परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी । चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आज (28 सप्टेंबर) मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. तसेच जळगाव तालुक्यातील वाघूर धरण पूर्णपणे भरल्यानंतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणाजवळील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार प्रमाणात पाऊस झाला. यामुळे २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता वाघूर धरण हे पूर्णपणे भरले. यानंतर प्रारंभी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने आता धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे.

वाघूर धरणाच्या खालील बाजूला असणार्‍या नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुणीही नदीच्या पात्रात प्रवेश करू नये. तसेच गुरांना नदीच्या पात्रात उतारू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here