जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या गुरांचा ट्रक पोलिसांनी पकडला असून चालक व विलन्नर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ट्रक क्रमांक PA-03 AZ 9907 या ट्रक गुरांचा वाहतूक करताना पकडण्यात आला वाकोद गावाजवळ पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना गुप्त माहितीवरून या ट्रकला वाकोद गावाजवळ रंगेहात पकडण्यात आले या ट्रक मध्ये चौकशी केली असता यामध्ये मयत आठ जर्सी गाय एक लहान गाय असे आढळून आले.
या ट्रकमधील चालक संदीप चंदू राम कुमार राहणार पंजाब व विलन्नर मानफिरीही अंग्रेज सिंग राहणार पंजाब या दोघांना रंगेहात पकडून पोलिसांनी ट्रक सह ताब्यात घेतले आहे या दोघांविरोधात पहूर पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल श्री राम धुमाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 453 भादवि कलम 429 व प्राणी संरक्षण (साधारण,) अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहे