वाकोद येथील महिलेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस ४ पर्यंत पोलिस कोठडी

0
12

पहुर. ता. जामनेर, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या वाकोद येथील ३५वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची घटना काल दि.३१रोजी रात्री१वाजेच्या सुमारास वाकोद येथे घडली होती. याप्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली होती.

आरोपी गणेश भगवान मोहिते (वय३२)रा.वाकोद यास आज दि.१जानेवारी२२रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास ४जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here