मुंबई : प्रतिनिधी
वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि MMRDAचे अधिकारी मिळून चौकशी करतील, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
ही बातमी पण वाचा : बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भाग कोसळला; १३ जण जखमी
आज पहाटे ४च्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणारा निर्माणाधिन पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्याने त्यात १४ कामगार जखमी झाले. सुदैवाने या दुघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनास्थळाला आज भेट देऊन पाहणी केली. तसेच परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.