जळगांव प्रतिनिधी -मल्ल विदयेत तरबेज असणारे आदयक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या युद्ध कौशल्याबद्दल पुरेशी माहिती समाजासमोर येवू शकली नाही याबद्दल खंत व्यक्त करून संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात युद्ध कला कौशल्य केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे विचार मांडले.
वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृति दिनानिमित्त जनसेवा विचारधारा फाऊंडेशन गोलाणी मार्केट येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी विचार व्यक्त करतांना भारत ससाणे यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या अजोड पराक्रमाची माहिती दिली. लढाऊ घराण्याचा वारसा असणारे लहुजी साळवे हे दांडपट्टा फिरविणे,घोड्यावर स्वारी,भालाफेक, बंदूक चालविणे,तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रुला मात देणे, शत्रुंची गुप्त माहिती मिळविणे आदि युद्ध कलेत तरबेज व पारंगत होते.यामुळे शासनाने त्यांच्या नावाने जिल्हास्तरावर युद्ध कला,कौशल्य प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केल्यास त्याचा देशाला फायदा होण्यास मदत मिळेल.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन जनसेवा विचारधारा फाऊंडेशनचे अध्यक्ष-निलेश बोरा यांनी केले.यावेळी बिल्डर्स अनिल चौधरी, ॲडव्होकेट-अभिजित लोखंडे,छावा मराठा संघटनेचे- अमोल कोल्हे,दिलीप शिंपी,अशोक शिरसाळे,हरिष अंभुरे,समीर सोनवणे,कुणाल चौधरी,राजेश पाटील,प्रमोद घुगे,जितेंद्र गवळी,भावेश ढाके,कमलाकर इंगळे,शेखर देशमुख,अशोक गवळी,इकबाल शेख,जावेद सैय्यद,विनोद गवळी,ललित शर्मा, मुकेश कुरील,लक्ष्मण पाटील,जितेंद्र वाणी,सागर गवळी,विनय निंबाळकर,अरविंद काकडे, ऋषिकेश करंजे,समाधान पवार आदि उपस्थित होते.