जळगाव : प्रतिनिधी
पर्यावरणाचा र्हास थांबवून वसुंधरा मातेला जैवविविधतेने वैभवशाली करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जळगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी केले.
तालुक्यातील असोदा येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व सार्वजनिक विद्यालय असोदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात त्या बोलत होत्या.
यावेळी मुलांना पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी सार्वजनिक शपथ देण्यात आली. रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही झाले .
या कार्यक्रमास शिक्षण विस्ताराधिकारी प्रतिमा सानप पंचायत समितीच्या कक्षअधिकारी श्रीमती तडवी , केंद्रप्रमुख श्री वाघे , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ खाचणे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळी व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थीनींनी साकारलेल्या रांगोळीतून पर्यावरणाचा र्हास थांबवण्यासाठी प्रबोधन करणारे संदेश दिले होते. या रांगोळया खूपच लक्षवेधक होत्या.