Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वराड बुद्रुक येथे भाजपला खिंडार; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा
    जळगाव

    वराड बुद्रुक येथे भाजपला खिंडार; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

    saimat teamBy saimat teamOctober 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वराड बुद्रुक येथील उपसरपंच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे वराड येथे भाजपला भगदाड पडले असून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ना. गुलाबराव पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे व जिल्हा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रवेशामुळे वराड येथे शिवसेनेचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

    पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत आज अजिंठा विश्रामगृहात वराड बुद्रुक येथील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात उपसरपंच सौ. कल्पना संदीप सुरळकर, संदीप सुरळकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव रामा सपकाळे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन अर्जुन सिताराम सुरळकर, ग्रामपंचायत सदस्य संजय लालचंद गायकवाड, सुरेखा चंद्रकांत सोनवणे, माजी उपसरपंच सुभाष राजाराम जाधव, विकासो सदस्य भावलाल बुधा जाधव, सरला बुधा जाधव आदींसह अनिल सुभाष सपकाळे, राजेंद्र कैलास जाधव, ज्ञानेश्‍वर भिका जाधव, नबीशा मकबूलशा फकीर, सुसुफशा याकूबशा फकीर, इबा कासमशा फकीर, ज्ञानेश्‍वर अशोक सुरळकर, कैलास पंडित जाधव, अलीमशा बशीरशा फकीर, बबलू संतोष सोनवणे, सतीश भास्कर नेरे, गणेश ठोंबरे, नितीन ज्ञानेश्‍वर जाधव, नशीरशा बशीरशा फकीर आदींसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

    पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपमधून शिवसेनेत आलेल्यांचे स्वागत केले. शिवसेनेची वाटचाल ही समाजाभिमुख राहिली असून सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कामगिरीवर विश्‍वास ठेवून शिवसेनेकडे सर्वांचे ओढा वाढला आहे. भविष्यात देखील आम्ही याच प्रकारे आपली सेवा करत राहू, आपण सर्वांनी शिवसेनेची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवावीत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

    याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पंचायत समिती सभापती जनाआप्पा कोळी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, वावडद्याचे माजी सरपंच रवी कापडणे, शिरसोली माजी सरपंच अनिल पाटील, रमेश सोनवणे, शिवसेनेचे मुकेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले तर आभार रवी कापडने यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon Police : जळगाव पोलीस दलाची कारवाई; १९ गुन्ह्यांमधील ७१० किलो गांजा नष्ट

    December 24, 2025

    Jalgaon : अल्पवयीन मुलीचे अपहरण

    December 24, 2025

    Jalgaon : जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.