भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव येथे पिस्तूलाचा धाक दाखवून व्याजाची वसूली केल्याचा दाखल गुन्ह्याप्रकरणी रिपाईचे राजू सुर्यवंशी यांना भुसावळ येथून पोलीसांनी कोम्बींग ऑपरेशनदरम्यान त्यांच्या घरातून अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी व त्यांचे बंधू अनंत सुर्यवंशी यांच्या विरोधात वरणगाव पोलीसात पिस्तूलाचा धाक दाखवून व्याजाची वसूली करण्यासाठी धमकावण्यासह दागिने हिसकावल्याचा आरोप करत फिर्यादी संजय त्रिलोकनाथ खन्ना (वय ५६, रा.साईनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव फॅक्टरी) यांनी गुन्हा दाखल केला होता. सदर फिर्यादीवरुन वरणगाव पोलीसात भादंवि ३९२, ४५२, ५०४, ५०६ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी राजू सुर्यवंशी यांचा शोध घेतला असता ते कोठेही मिळून आले नव्हते.
दरम्यान, भुसावळ परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून सहा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबविले गेले. त्यात काल रात्री राजू सुर्यवंशी हे त्यांच्या निवासस्थानी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत बाजारपेठ पोलीस स्थानकात आणण्यात आले. दरम्यान, राजू सुर्यवंशी यांच्यावर वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल असल्याने त्यांना वरणगाव पोलीस स्थानकाचे सपोनि बोरसे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई सहा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरीश भोळे, रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.