वरणगाव । साकीनाका येथील महिलेवर सामुहिक अत्याचार करून तीस गंभीर दुखापत केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात महिला सुरक्षित नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पावर हे झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप भाजपा महील आघाडीने राज्य सरकारविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
मुंबई येथील साकीनाका येथील ३० वर्षीय महिलेवर नराधमांनीं बलात्कार करून गुप्तांगामध्ये रॉड घुसविला, त्यामुळे ती महिला बेशद्ध पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे राज्य कायद्याचे नाही दिवसा ढवळ्या महिलांवर अत्याचार होत आहे. महिला सुरक्षित नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे झोपेचे सोंग घेत आहे, कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली असून याला महाविकास आघाडी जबाबदार आहे, या महिलेच्या मृत्यला जबाबदार असणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा व फाशी द्या अशी मागणी आज भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी यांनी यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनला धरणे आंदोलनावेळी केली. आरोपींना अटक न झाल्यास महिला रस्त्यावर उतरून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे यावेळी शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी यांनी सांगितले. या वेळी रूपाली काळे मंदा थटार, उषा पवार, शारदा गंभीर माळी, गंगुबाई माळी, नीता तायडे, मनीषा माळी, सविता माळी, वर्षा बढे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, जिल्हा सरचिटणीस डॉ. सादिक शेख, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, सरचिटणीस गोलू राणे, उपाध्यक्ष नटराज चौधरी, भाजयुमोचे शहराध्यक्ष संदीप भोई, सरचिटणीस आकाश निमकर, भाजयुमो तालुकाउपाध्यक्ष किरण धुंदे, प्रसीद्धी प्रमुख राहुल जंजाळे, रमेश पालवे, आवेश खान, डॉ. प्रवीण चांदणे, शहराध्यक्ष डी. के. खाटीक, मुस्लिम अन्सारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अपयशी महाविकास आघाडीच्या विरुद्ध महिलांनी घोषणाबाजी केली. यावेळी निवेदन ठाणे अंमलदार वर्षा पाटील, अतुल बोदडे चौहान यांना देण्यात आले.